बुलढाणामहाराष्ट्र

येणाऱ्या १८ व १९ एप्रिल २०२६रोजी उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन होणार!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 

प्रतिनिधी संग्रामपूर, रतन भगत.

मुंबई दि.१०/३/२०२६:-सविस्तर वृत्त असे की अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी लातूर जिल्ह्यात उदगीर येथे होत असल्याचे घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीकर यांनी आज येथे केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपूर्ण होत असून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील. पत्रकारांची मातृ संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ८७ वर्षाची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे दर २ वर्षांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात राष्ट्रीय अधिवेशन होत असते. यापूर्वी रोहा पिंपरी चिंचवड शेगाव नांदेड येथे परिषदेची अधिवेशनात झालेली आहेत. यावेळेस उदगीर येथे अधिवेशन होत असून अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे. परिषदेच्या एका शिष्टमंडळाने अधिवेशनाचे स्वागताअध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी परिषदेची विनंती मान्य केली असून “मी नक्की येतो “असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना आज भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे, परिषदेचे मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, परिषदेचे लातूर विभागीय सचिव तथा अधिवेशनाचे मुख्य संयोजक सचिन शिवसेटे, सातारा जिल्हा अध्यक्ष हरीश पाटणे, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे ,संयोजन समितीचे युवराज धोत्रे आधी होते. यंदाचा अधिवेशन हटके होणार आहे. देशभरातील मान्यवर पत्रकारांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. यंदाच्या अधिवेशनास देशभरातून जवळपास ३००० पत्रकार येतील असा अंदाज असून त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात येत आहे. अधिवेशनाच्या उदगीर येथील कार्यालयाचे उद्घाटन देखील नुकतेच एस. एम .देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी पत्रकारांच्या दृष्टीने गौरवाचा सोहळा असलेल्या परिषदेच्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा आव्हान स्वागत अध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले मुख्य विश्वस्त एसएम देशमुख अध्यक्ष मिलिंद अष्टीकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूर भाई शेख ,महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर ,डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभागीय सचिव तथा प्रमुख संयोजक सचिन शिवशेटे, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे, संयोजन समितीचे श्री युवराज धोत्रे आदींनी केले आहे. विशेष म्हणजे हे यावर्षीचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन फार मोठ्या प्रमाणात आकर्षक होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button