महाराष्ट्रसामाजिक

महू मध्य प्रदेश कडे जाणाऱ्या पदयात्रेचे तेल्हारांमध्ये आगमन*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता.प्रतिनिधी विजय घोडेतेल्हारा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

*जयंतीनिमित्त पू भदंत ज्ञानज्योती महात्थवीर आणि भिकू संघ संघारामगिरी ताडोबा अभयारण्य पो.बोथली तालुका चिमूर जि. चंद्रपूर महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात दि.27/03/23 ला अशोक वाटिका अकोला येथून प्रारंभ होऊन महू मध्य प्रदेश कडे निघालेल्या पदयात्रेचे दि.30 ला तेल्हारा येथे आगमन झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान तेल्हारा मध्ये या यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले सामूहिक मानवंदना तसेच प्रार्थना करण्यात आली त्यावेळी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता सर्वप्रथम भदंत ज्ञानज्योती यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध ,महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले मंचावरून संबोधन करत असताना भदंत ज्ञानज्योती यांनी महात्मा ज्योतिराव फुले, तथागत गौतम बुद्ध ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. महामानवांनी केलेल्या कार्याची माहिती देऊन जन समुदायाला जागृत केले तसेच ही पदयात्रा 16 दिवसात महू मध्य प्रदेश येथे पोहोचणार असे सांगून हि पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली, संत तुकाराम चौक तेल्हारा येथे भदंत ज्ञानज्योती यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या नाम फलकाला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच टावर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले शहरात पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय,बोलो रे बोलो जय भिम असे जयघोष करत ही पदयात्रा माळेगाव बाजार कडे मार्गस्थ झाली. या पदयात्रेमध्ये असंख्य बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button