झाड लावून संगोपन करण्याची घेतली शपथ; धार्मिक परंपरेला दिली मूठमातीअस्थी विसर्जन करून त्यावर आंब्याचे झाड लावताना समाज बांधव

.(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) शेगाव | तालुक्यामध्ये लासुरा गावातील महावितरणचेसहायक अभियंता सुनील जवंजाळ यांच्या आईचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दि.१६ मे रोजी निधन झाले. त्यांच्या अस्ति विसर्जनाचा कार्यक्रम हा दि.१८ मे रोजी आयोजित केला होता. त्या ठिकाणी त्यांनी त्या असती कोणत्याही नदी किंवा नाल्यांमध्ये न टाकता आपल्या शेतामध्ये खड्डा खोदून व त्या खड्यांमध्ये असती विसर्जन करून त्यावर एक आंब्याचे झाड लावले आहे. याच ठिकाणी प्रास्ताविक भाषणामध्ये समाजाला व इतर लोकांना संबोधित करताना सांगितले की, मनुष्याचा ज्यावेळेस मृत्यू होतो. त्यावेळेस तो पंचतत्वामध्ये विविध होतो. त्यामुळे नदी किंवा नाल्यामुळे त्यांच्या असती टाकण्याच्या ऐवजी त्या असताना त्या व्यक्तीच्या आठवण म्हणून त्या असती विसर्जन करून त्याठिकाणी त्यांची आठवण म्हणून एक झाडाची रोपणी करावे, असा संदेश सर्व समाज बांधवांना दिला आहे. ले



