नभांगणीची पर्वणी फिरती चांदणी

-स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा/अकोला प्रतिनिधी विजय घोडे- पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्याने आपणास सूर्य,तारे चंद्र व ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जातांना दिसतात.अशा एखाद्या वेळी एखादी चांदणी सरकताना दिसून येते, हे बहुधा मानव निर्मित कृत्रिम उपग्रह असतात. अंतराळ अभ्यास व संशोधन यांसाठी सोळा देशांनी एकत्र येऊन एक महाकाय स्पेस स्टेशन उभारले आहे.ही अनोखी आकाश पर्वणी आकाशप्रेमी लोकांनी अनुभवायला हवी असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे. जगातील सर्वात महागडी ही वस्तू दरताशी सूमारे २८हजार किलोमीटर या वेगाने साधारण चारशे किलोमिटर अंतरावरून पृथ्वीभोवती फिरत असल्याने हे स्पेस स्टेशन जेंव्हा आपल्या भागात येते तेव्हा ते आपण नुसत्या डोळ्यांनी पाहून आनंद घेऊ शकतो.स्थान परत्वे त्याच्या तेजस्वी पणात,वेळात व दिशेत बदल होत असतो. अंतराळविरांचे हे एक महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र असून जवळपास शून्य गुरुत्वाकर्षण भागात कित्येक दिवस प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. दि.११मे ते १६ हे दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन घेता येईल. दि.*११* ला रात्री ७-१३ते ७-१६ या वेळी दक्षिण आकाशात पूर्वेकडे जातांना दिसेल.ही प्रकाशणारी फिरती चांदणी पाहील्यानंतर पुन्हा रात्री ८-४८ते८-५१या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस हा आकाश नजारा बघता येईल.दि.*१२* मेच्या पहाटे ५-०२ते५-०७ पर्यंत उत्तरेकडील आकाशात पूर्वेकडे फिरत जातांना दिसेल.याच दिवशी रात्री ७-५९ ते ८-०६यावेळीअधिक प्रमाणात प्रकाशतांना नैॠत्य ते ईशान्य आकाशात बघता येईल.दि.*१३* ला पहाटे ४-१३ते४-१८ या वेळी उत्तर पूर्व बाजूला आणि रात्री ७-११ते ७-१७ या वेळी नैॠत्य ते ईशान्य आकाशात अधिक चांगल्या प्रतीची चांदणी बघायला मिळेल.पुन्हा *१४* मे रोजी पहाटे ५-०१ते ५-०८ या वेळात वायव्य ते आग्नेय आकाशात अपूर्व अनुभूती घेता येईल.पुन्हा याच दिवशी रात्री ८ ते ८-०४ या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस पाहता येईल.दि.*१५* रोजी पहाटे ४-१३ ते ४-१९ या वेळी उत्तरेकडून पूर्वेकडे आणि रात्री ७-११ते ७-१६या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल.दि.*१६* मे ला जरा पहाटे ३-२९ते३-३० या वेळी पूर्व आकाशात अगदी कमी वेळ तर पुन्हा पहाटे ५-०२ते५-०६यावेळी पश्चिम आकाशात दक्षिणेकडे जाताना बघता येईल.असा हा सहा दिवसांचा अनोखा आकाश नजारा अवश्य बघावा व त्याचा आनंद इतरांना देण्यात यावा



