शैक्षणिकसामाजिक

डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयातील इतिहास विभागाचा अभ्यास दौरा, तेल्हारा येथील गौतमेश्वर संस्थान पाय विहीर ला दिली भेट!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा

तालुका प्रतिनिधी दि.२१; स्थानिक तेल्हारा येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव येथील इतिहास विभागातर्फे स्थानिक इतिहासाची विद्यार्थ्यांना सविस्तर ओळख व्हावी. या उद्देशाने तेल्हारा परिसरातील प्राचीन ठिकाणांना भेटी दिल्या. त्यापैकी गौतमा नदी किनाऱ्यावरील पुरातन गौतमेश्वर मंदिराला आज इतिहास विभाग अभ्यास मंडळाने अधिक अभ्यासपूर्ण माहिती मिळविण्यासाठी भेट दिली. इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. धीरजकुमार नजान यांनी विद्यार्थ्यांना इसवी सन १६९७ साली स्थापन झालेल्या स्वयंभू गौतमेश्वर मंदिराचा पुरातन इतिहास सविस्तर सांगितला. येथे स्थापित स्वयंभू शिवलिंगाची मूर्ती १२०० वर्षापेक्षा पुरातन असल्याचे बोलले जाते. शिवाय तेथे असलेल्या पायरी विहीर अर्थात बारव विहिरीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तेथील पुजाऱ्याने विद्यार्थ्यांना मंदिराची अधिक महिती व्हावी यासाठी मंदिराची माहिती पुस्तिका भेट दिली. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयराम गायकवाड हेही उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना अतिशय मौलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी इतिहास विषयाचे तब्बल ५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी या अभ्यास दौऱ्यात सहभागी होते. विद्यार्थ्यांनी स्थानिक गौतमेश्वर मंदिराविषयी अभ्यासपूर्ण माहिती लिहून घेतली व त्यावर अहवाल लेखन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button