तेल्हारा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य ज्योतिर्लिंग दर्शन झाँकी , ६ मार्चला होणार उद्घाटन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि. ६ :-
प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तेल्हारा च्या वतीने महाशिवरात्री च्या पावन पर्वावर सत्यम-शिवम-सुंदरम शिव परमात्म्याची भव्य झाँकी तयार करण्यात येत आहे.६ मार्च च्या सायंकाळी ठीक ५.०० वा. मान्यवरांच्या उपस्थितित भव्य उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. ६ मार्च ते ९ मार्च या चार आयोजनात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ही झाँकी दर्शनासाठी तेल्हारा शहरातील साई मंदिर रोड, गजानन नगर स्थित ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रावर निशुल्क उपलब्ध राहणार आहे. महाशिवरात्री निमित्त प्रोजेक्टर शो द्वारा १३ विविध स्वरूपात शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा आगळावेगळा अनुभव अनुभवता येणार आहे.तसेच राजयोगच्या माध्यमातून दिव्य शांतीची अनुभूती आणि विश्व नवनिर्माण अध्यात्मिक प्रदर्शनी विशेष करून आयोजित केली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे ८ मार्चला ज्योतिर्लिंग प्रदर्शनी सकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
तेल्हारा शहरासह संपूर्ण तालुक्यातील शिव भक्तांनी या भव्य ज्योतिर्लिंग प्रतिकृतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांनी केले आहे. झाँकी तयार करण्यासाठी केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदींच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्माकुमारी स्नेहल दीदी, बिके श्याम भाई यांच्यासह सर्व ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी विशेष सहकार्य केले. ब्रह्माकुमारीज रिसोड केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी स्वतः उपस्थित राहून ज्योतिर्लिंग तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे.



