अपघातजळगावा जिल्हा

ऐन वाढदिवशीच तरूणाचा दुर्देवी मृत्यू

जळगाव, स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

यावल तालुक्यातील कोरपावली गावातील तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच जळगाव- भुसावळ महामार्गावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुर्देवी मृत्यु झाला.

त्यांचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोरपावली परिसरात शोककळा पसरली आहे. राहुल संतोष सोनवणे (वय २१) व दिपक उर्फ देवेन्द्र दत्तु तायडे (वय २३) हे दोन्ही मित्र दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री १o ते १२ वाजेच्या दरम्यान शाईन कंपनीच्या मोटरसायकल (क्र. एमएच १९ ईएल ४०९७) या दुचाकी वाहनाने भुसावळकडून जळगावकडे जात असतांना महामार्गावरील गोदावरी हॉस्पीटलजवळ असलेल्या एका ढाब्या जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली.

या  भीषण अपघातात राहुल सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचे वृत्त कळताच कोरपावली गाव व परिसरात सर्वत्र एकच शोककळा पसरली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button