अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे “महसूल पंधरवाडा ” अंतर्गत विविध योजनांचे माहितीवर्धक शिबिर संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय घोडे
अकोट/मुंडगाव दि. ०६ ;
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील श्री.संत गजानन महाराज पादुका संस्थान येथे शनिवार दि.०३ ऑगष्ट २०२४ रोजी महसूल पंधरवाडा अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा माहितीवर्धक कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.संत गजानन महाराज पादुका संस्थानचे अध्यक्ष विलास बहादूरे हे असून कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी मा.श्री.मनोज लोणारकर व तहसीलदार मा.श्री.डॉ.सुनील चव्हाण, बार्टी चे प्रकल्प अधिकारी विजय पी.बेदरकर यासह मंडळ अधिकारी मनोहर अढाऊ, मुंडगाव वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती उषा भिरडे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहीभाते, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश वारकरी, बाळकृष्ण भगेवार, वसतिगृह निरीक्षक विनोद गायगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात मा.उपविभागीय अधिकारी मा. मनोज लोणारकर व तहसीलदार मा.डॉ.सुनील चव्हाण यांनी महसूल पंधरवाडा अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली तद्नंतर बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय पी.बेदरकर यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजना तसेच मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजने बद्दल सविस्तर माहिती उपस्थिती जेष्ठ नागरिकांना दिली. त्यामध्ये सदर योजनेचे उद्दिष्ट हेतू व मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप यासह योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे इ. माहिती प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील तलाठी राजेंद्र वानखडे, तलाठी रितेश केळकर, तलाठी प्रज्ञा गावंडे, तलाठी राहुल बंकेवार इ. सह समस्त मुंडगाव गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवून या माहितीवर्धक शिबिराचा लाभ घेतला. यासह मुंडगाव तसेच परिसरातील अनेक जेष्ठ नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र वानखडे यांनी केले तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालन राहुल भेले यांनी केले.✍️



