आलेवाडी येथे वंचितचा आदिवासी मेळावा अॅड.बाळासाहेब आंबेडकर बुधवारी सातपुड्यात

आलेवाडी येथे वंचितचा आदिवासी मेळावा अॅड.बाळासाहेब आंबेडकर बुधवारी सातपुड्यात
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे
सोनाळा भाजपाच्या एकछत्री गडाला सुरुंग लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली आहे. बुधवार १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सातपुड्यातील आलेवाडी या आदिवासी गावात भव्य आदिवासी मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
या मेळाव्याला वंचित बहुजन
आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे आधारस्तंम अध्येय बाळासाहेब आबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. ते शोषीत पीडित आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेत आदिवासींसाठी राज्यभर लढा देत आहेत. त्या अनुषंगाने वंचित ने सातपुड्या पासून प्रारंभ केला आहे. या आदिवासी मेळाव्या द्वारे वंचित प्रथमच मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहे. यासाठी मोठी जय्यत
तयारी सुरु आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तालुका उपाध्यक्ष आदिवासी हुसेन सुरत्ने हे राहणार आहेत.
डॉ. अनिल अमलकर, अॅड अनिल इखारे, प्रशांत वाघोदे, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, निलेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष रामकृष्ण रजाने आतिष खराटे अनिल वाकोडे, प्रा. सोनेकर इत्यादी मान्यवर
तर स्वागताध्यक्ष वंचितचे जेष्ठ नेते डॉ प्रविण पाटील, वंचितचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेलके हे राहणार आहेत. तर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, उपाध्यक्ष शरद वसतकार, बुलढाणा प्रभारी प्रदिप वानखडे, राज्य उपाध्यक्ष सविता मुंडे, धैयवर्धन फुंडकर, साहेबराव तायडे केले आहे. (वि.प्र.)
या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका सल्लागार अँड पी के घाटे यांनी



