जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगरात हायमास्ट दिवे अद्याप झाकलेलेच; आचारसंहिता संपूनही प्रशासनाचे दुर्लक्ष?

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):
मुक्ताईनगर तहसील परिसरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हायमास्ट दिवे आजही झाकून ठेवलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आचारसंहितेच्या काळात झाकण्यात आलेले हे हायमास्ट दिवे आचारसंहिता संपून बराच कालावधी उलटल्यानंतरही अद्याप उघडण्यात आलेले नाहीत.

स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत असून, सार्वजनिक सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या हायमास्ट दिव्यांचा वापरच होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने केवळ आचारसंहितेच्या काळापुरते हे दिवे झाकून ठेवणे अपेक्षित असताना, त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

या हायमास्ट दिवे हे रक्षा ताई खडसे यांच्या निधीतून दिल्याचे त्यावरती वर्ष व दिनांक नमूद आहे व भारतीय जनता पार्टीचे नाव आहे, ते मात्र झाकूनच ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना समभ्रम होत आहे . त्यामुळे प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार, तसेच हे हायमास्ट लावलेले बोंद्रे कधी मोकळे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button