बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मुख्याधिकारी सतीश गावंडे न.प.तेल्हारा यांच्या लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता

मुख्याधिकारी सतीश गावंडे न.प.तेल्हारा यांच्या लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता! ,स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या अभ्यासिके करिता विशाल नांदोकार यांच्या उपोषणाला यश!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी-विजय घोडे

तेल्हारा दि.०८ : तेल्हारा शहरात अनेक सभागृह जास्तीत -जास्त काळ हे विनाकामाचे,बंदच असतात. त्या सभागृहचे रुपांतर हे अभ्यासिकेत व्हावा व गरजू व गरीब स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा या प्रमुख मागणी घेऊन विशाल नांदोकार यांनी आक्रमक पवित्रा घेत दि.०७ नोव्हेंबर २०२३ रोजी उपोषण करण्याचे ठरविले होते.
तेल्हारा शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिकांची कमतरता असून दिवसेंदिवस शहरात मोठ्या प्रमाणात सभागृहांचे उद्घाटने होत आहेत. याचा नेमका कुणाला फायदा होते हा प्रश्न वेगळीच भूमिका घेतो. मात्र शहरातील भव्य सभामंडपाचे रुपांतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिकेत व्हावे याकरिता विशाल नांदोकार यांनी पुन्हा आक्रमक पवित्र घेत मुख्याधिकारी यांना पंधरा दिवसाची मुदत देत अभ्यासिकेची मागणी केली होती. यावर नगर पालिकेचे कोणतेच उत्तर न मिळाल्याने विशाल नांदोकार यांनी पालिकेला हादरून टाकत उपोषणाला सुरुवात केली असता तोच मुख्याधिकारी यांनी अर्ध्या तासातच तोडगा काढत ,निधी प्राप्त होताच अभ्यासिका करण्याचे असे लेखी आश्वासन देवून उपोषणाला स्थगिती दिली.
तेल्हारा तालुका हा सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगात वसलेला एक अविकसित आणि शिक्षणाच्या बाबतीत अप्रगत व मागास असलेला तालुका आहे. त्यामुळे परिसरातील गोर गरीब परिवारातील होतकरू विद्यार्थी हा जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्याकरिता जाऊ शकत नाही. त्याकरिता नगर पालिकेने एक उत्तम व्यवस्था म्हणजे शाळा क्र. १ मध्ये एक अभ्यासिका बांधून गोर गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य केले असुन हि बाब कौतुकास्पद आहे . शहरासह तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ति जागा बहुतांना अपुरी पडत आहे, तसेच प्रत्येकाचा घरी योग्य ते वातावरण नसल्याने व्यवस्थित आभ्यास होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची आवश्यकता आहे. त्यावर पर्याय म्हणजे तेल्हारा तालुका क्रीडा संकुल परिसरातील कित्येक दिवसांपासून खंडार परिस्थितीत असलेले विनाकामाचे असलेले न.प.चे सभागृह आहे, सदर सभागृहाची देखभाल व दुरुस्ती करून परिसराची साफसफाई व लाईनची व्यवस्था करून विद्यार्थ्यांकरिता एक सुसज्ज अभ्यासिका येथे होऊ शकते. सदरील बाबत विशाल नांदोकार यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना तोंडी तसेच सोशल मिडिया वरील पालिकेच्या ग्रुपवर सुद्धा कल्पना दिलेली आहे. त्याचप्रमाणे नगर परिषदेला लेखी निवेदन सुद्धा दिले आहे, निवेदनाच्या प्रती लीपी मा.दीपक वसंतकुमार केसरकर शिक्षणमंत्री म.रा., मा.राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अकोला,मा.अजित कुंभार.जिल्हाधिकारी अकोला, मा.संतोष येवलीकर तहसीलदार तेल्हारा, मा.सचिन यादव ठाणेदार पो.स्टे. तेल्हारा यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या होत्या यावर कोणताही तोडगा न निघाल्याने विशाल नांदोकार यांनी ७ नोव्हेंबर रोजी नगर पालिकेला हादरून टाकत उपोषणाला सुरुवात केली असता अर्ध्या तासातच मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी अभ्यासिकेची मागणी रास्त असल्याचे मान्य करून निधी प्राप्त होताच अभ्यासिका लवकरात- लवकर बनवून देण्याचे लेखी आश्वासन देवून उपोषणाची सांगता केली.यावेळी प्रवीण दादा वैष्णव व विकास पवार उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button