तेल्हारा येथील शेतकरी आक्रोश आंदोलनास प्रहार संघटनेचा जाहीर पाठिंबा

तेल्हारा येथील शेतकरी आक्रोश आंदोलनास प्रहार संघटनेचा जाहीर पाठिंबा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
संतोष गिऱ्हे
तेल्हारा, : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनास प्रहार जनशक्ती पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
शेतकरी कर्जमाफी, हक्काचा पीकविमा, शेतमालाला हमीभाव तसेच शेतकऱ्यांवरील अन्यायकारक अटी-शर्ती रद्द करण्याच्या मागण्या न्याय्य असल्याचे प्रहार संघटनेने म्हटले आहे.
राज्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असून शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी
प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती प्रहार युवक उपजिल्हाप्रमुख भैय्या राजेशराव खारोडे व प्रहार तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर आखरे रुग्णसेवक अनंता बोर्डे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार संघटना सदैव सोबत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



