खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

अग्निविर अंतर्गत नेव्ही मध्ये निवड झालेल्या अग्निविर कल्पेश सपकाळेचा डॉ केतकी पाटील यांनी केला सत्कार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

मुक्ताईनगर शहरातील ” कल्पेश विजय सपकाळे ” याची अग्निवीर अंतर्गत नेव्ही मध्ये नुकतीच निवड झाली. मुक्ताईनगर तालुक्यातील अग्निवीर अंतर्गत नेव्ही मध्ये निवडला जाणारा कल्पेश हा पहिलाच युवक आहे, ही तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी बाब आहे. याचीच दखल घेत आज गोदावरी फाऊंडेशन सदस्या डॉ.सौ.केतकीताई पाटील यांनी अग्निवीर कल्पेश सपकाळे यांच्या

निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान केला.
या दिवाळी पर्वात, या आनंददायी निवडीमध्ये मुक्ताईनगर येथील कल्पेश सपकाळे यांचे वडील विजय सपकाळे,अशोक महाजन, अतुल माळी, धनंजय सापधरे, समाधान राखुडे, सुमित बोंडे,प्रणव नेहेते,सुविध्द सोनवणे आणि संपूर्ण सपकाळे परिवार उपस्थित होता.मुलांच्या यशात आई – वडिलांचे श्रम व संस्कार असतात त्यामुळे कल्पेश च्या पालकांचे देखील डॉ केतकी पाटील यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी,उपस्थित युवकांशी संवाद साधतांना युवाशक्तीने त्यांच्या क्षमतांचा उपयोग राष्ट्रासाठी करण्याचे मार्गदर्शन ही डॉ.केतकीताई यांनी केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button