गुन्हेगारीविदर्भसामाजिक

पांग्रा येथे तिनं घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंची रुपये चोरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

सि. राजा :- तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील तिन जणांचे घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास 13 ते 15 लाखांचा ऐवज लंपास झाल्याची घटना 29 जानेवारी रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. –

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे दुपारी तीन ते चार दरम्यान लक्ष्मण नारायण घुगे यांच्या घराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करून कपाटातील एक पोत अंदाजे तीन तोळे लंपास केले. तर समोरच राहणारे ग्राहक सेवा केंद्राचे मालक दीपक त्र्यंबक उगले यांच्या घराचे कुलूप तोडून दहा ते बारा तोळे सोने व नगद 43 हजार रुपये अंदाजे किंमत 7 लाख रुपये, असा ऐवस लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा

पोलीस स्टेशन अंतर्गत बीट जमदार निवृत्ती पोफळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन कानडे, दीपक वायाळ, मनोज खरडे, पुरुषोत्तम आघाव यांनी घटनास्थळी धाव घेवून चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आगेफळ येथील गोपाल देविदास वोल्टे यांच्या घरात शिरून साडेपाच तोळे सोने व दहा हजार नगद घेऊन मलकापूर पांग्राकडे पोबारा केल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले. मात्र, वृत्तलिहेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तसेच ठाणेदार स्वप्निल नाईक व बीट जमादार निवृत्ती पोफळे हे पुढील तपास करीत आहेत. सदर तिन्ही ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी जवळपास सोन्याच्या दागिन्यांसह बारा ते पंधरा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button