खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

गाडी क्र.०११३९/०११४० नागपूर ते मडगाव गोवा प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक दैनिक कायमस्वरुपी सुरु करण्याची रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी (रजि) विदर्भ खान्देश संपर्क प्रमुख वैभव बहुतूले यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

खान्देश,विदर्भ प्रांतातील नागरिकांना कोकण प्रांताकडे जाण्यासाठी दैनिक नियमित ०११३९/०११४० नागपूर मडगाव गोवा प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक गाडी सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी(रजि) विदर्भ खान्देश संपर्कप्रमुख श्री.वैभव बहुतूले यांनी मा.श्री नरेंद्र मोदी सो पंतप्रधान भारत सरकार,मा.श्री.अश्विनी वैष्णव सो केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार,मा.श्री.रावसाहेब दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार,मा.श्री.नितीन गडकरी सो केंद्रीय रस्ते वाहतूक सडक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री तथा नागपूर खासदार,मा.सौ.रेल्वे बोर्ड अध्यक्ष नवी दिल्ली,मा.श्री.संयुक्त निर्देशक कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली,मा.श्री.उप निर्देशक कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडे मागणी निवेदन करण्यात आले आहे*
मा.श्री नरेंद्र मोदी सो पंतप्रधान भारत सरकार,मा.श्री.अश्विनी वैष्णव सो केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार,मा.श्री.रावसाहेब दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार,मा.श्री.नितीन गडकरी सो केंद्रीय रस्ते वाहतूक सडक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री तथा नागपूर खासदार,मा.सौ.रेल्वे बोर्ड अध्यक्ष नवी दिल्ली,मा.श्री.संयुक्त निर्देशक कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली,मा.श्री.उप निर्देशक कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या निवेदनात म्हटले आहे की,नागपुर येथील महामानव भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभुमी,सेवाग्राम येथील महात्मा बापु कुटी,बुलढाणा जिल्ह्य़ातील माँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी बरोबरच मूर्तीजापूर येथील कार्तिकस्वामी मंदिर,शेगांव येथील गजानन महाराज मंदिर,बंकटलाल सदन,गोमाजी महाराज मंदिर,शेगांव निवासी गजानन महाराज यांचे आनंद सागर,नांदुरा येथील १०५ फुटी उभी हनुमान मुर्ती,नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी कोकण भागातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने नाशिक,बुलढाणा,अमरावती,अकोला,नागपूर,वर्धा,चंद्रपूर परिसरात येत असतात विदर्भातील मोठ्या संख्येने नागरिक कोकण भागातील दापोली येथील चंडिका मंदिर,मुरुड कर्दे आंजर्ले हेदवी गणपतीपुळे समुद्र किनारा,कणकवली येथील भालचंद्र महाराज,देवगड येथील कुणकेश्वर,वेंगुर्ले येथील सातेरी देवी,मालवण येथील भराडी देवी दर्शनाकरीता व निसर्गरम्य परिसर पाहण्याकरीता येत असतात
नागपूर पासुन मडगाव पर्यंत चालनात असणारी ०११३९/०११४० नागपूर मडगाव २७ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ द्वि साप्ताहिक चालु असणारी रेल्वेगाडी बल्लारशा/गोंदिया जं पासुन मडगाव पर्यंत दैनिक नियमित सुरु झाल्यास नागपुरातील नागपुरी संत्री,हल्दीराम मिठाई,हल्दीराम संत्रा बर्फी सोनपापडी,शेगांव प्रसिद्ध शेगांव कचोरी याचा आस्वाद कोकणवासीयांना कोकणातच घेता येईल कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी हापूस आंबा,काजूगर,मालवणी खाजा,कडक बुंदी लाडू,पापड,कुरडई,सावंतवाडी लाकडी खेळणी इ. खान्देश-विदर्भातील नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे याद्वारे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन भारतीय रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल
रेल्वे प्रशासनाने ०११३९/०११४० नागपूर मडगाव ही द्वितीय साप्ताहिक रेल्वेगाडी बल्लारशा/गोंदिया जं नियमित चालवण्याची मंजुरी दिल्यास खान्देश-विदर्भातील शेतकरीवर्गाला त्याचा लाभ मिळू शकेल तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि रेल्वे विभागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात राजस्व प्राप्त होऊ शकतो या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने ०११३९/०११४० नागपूर मडगाव ही रेल्वेसेवा बल्लारशा/गोंदिया जं येथुन नियमित सुरु करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था समिती कल्याण-सावंतवाडी(रजि) विदर्भ खान्देश संपर्कप्रमुख श्री.वैभव बहुतूले यांनी मा.श्री नरेंद्र मोदी सो पंतप्रधान भारत सरकार,मा.श्री.अश्विनी वैष्णव सो केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार,मा.श्री.रावसाहेब दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार,मा.श्री.नितीन गडकरी सो केंद्रीय रस्ते वाहतूक सडक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री तथा नागपूर खासदार,मा.सौ.रेल्वे बोर्ड अध्यक्ष नवी दिल्ली,मा.श्री.संयुक्त निर्देशक कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली,मा.श्री.उप निर्देशक कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात केली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button