गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा येथील बालाजी महाराज मंदिरात महिलेचे मंगळसूत्र चोरीला; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : बालाजी महाराज मंदिरात सकाळच्या आरतीदरम्यान दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल प्रथम माहिती अहवालानुसार, तक्रारदार महिला सकाळी शेजारील महिलांसोबत बालाजी महाराज मंदिरात आरती व दर्शनासाठी गेली होती. सकाळी सुमारे ६.१२ वाजता मंदिरात दर्शनासाठी जात असताना महिलांची गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे, अंदाजे २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र तोडून चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंगळसूत्र गळ्यात नसल्याचे महिलेच्या लक्षात आले. परिसरात शोध घेतल्यानंतर मंगळसूत्रातील काळे मणी मंदिरात पडलेले दिसून आले. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नायबराव सखाराम मोगल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मंदिरातील गर्दीच्या वेळी भाविकांनी आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button