बोगस सोयाबीन बियाण्यांचा सुळसुळाट; दोषींवर कठोर कारवाईची मागणी, शिवसेनेचे निवेदन

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुखा प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली :
तालुक्यात बोगस सोयाबीन बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घालून निवेदन सादर करण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात व शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे शहर संघटक प्रीतमभाई गैची, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर काही विक्रेते नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट व निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे विकून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत. या प्रकारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून, कृषी विभागाने तातडीने धडक कारवाई करणे आवश्यक आहे.
बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची सखोल चौकशी करून त्यांचा साठा जप्त करावा, संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस बियाणा माफियांना अभय देणाऱ्या यंत्रणेविरोधात शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून तात्काळ कंपनीचे प्रमुख व सर्व कृषीसेवक तालुका न्यायदंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त मीटिंग घेऊन न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात नमूद केले आहे
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहर प्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहरसंघटक प्रीतमभाई गैची, जिल्हाप्रमुख अशोक राजपूत शहर प्रमुख आनंद गैची, शिवसेना नेते लालसिंग मोरे सखाराम पाटील उपतालुकाप्रमुख राहुल मिसाळ हरी इंगळे छगन वानखेडे राहुल मिसाळ निवृत्ती घुबे शुभम वानखेडे उपशहर प्रमुख समाधान जाधव रवी पेठकर पुंजाजी शेळके अनिल जावरे सोहेल शहा किसान सेनाप्रमुख नारायण वाणी अशोकराव मोहिते दिनकर मोरे गजानन डुकरे लक्ष्मण इंगळे राजू इंगळे अंकुश इंगळे संजय कदम प्रदीप सपकाळ गजानन फोलाने दत्ता महिंद कृष्णा फोलाने गौतम गवई संजय सोळंकी सिद्धेश्वर सोळंकी सोपान भालेकर सुरज असोलकर किशोर महाले इम्रान शेख अशोकराव भोसले मालोजी गुजर डॉक्टर प्रकाश काळे सुपडाजी कोऱ्हाळे गजानन काकडे सचिन जोशी सिद्धेश्वर ठेंग वैभव ठेंग प्रदीप गरुड वसंतराव चौरे रामदास जाधव अंकुश डहाके राजू लोखंडे शिवाजी पंडित गणेश वाघमारे समाधान गायकवाड कैलास गायकवाड प्रल्हाद पवार गजानन शेळके समाधान पाटील मंगेश मोळवंडे तुषार वजगडे अशी असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते



