धुळ्यात जवानाची घर बांधकामात फसवणूक? कंत्राटदाराची अरेरावी, पोलिसांचं दुर्लक्ष? …..
देशाचा रक्षण करायचं की इकडे लक्ष द्यायच ? जवानाचा उद्विग्न सवाल…..
धुळे – धुळ्यात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणाऱ्या जवानाची घर बांधकामात खाजगी कंत्राटदाराने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वीच बांधकाम करण्यात आलेल्या घराला तडे पडत असल्याने कुठल्याही क्षणी घर कोसळण्याची शक्यता असल्याने जवानासह त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत फागण्याच्या कंत्राट दाराला वारंवार घर बांधकाम दुरुस्तीची विनंती करूनही कंत्राटदार अरेरावी करत असल्याचा आरोप जवानाने केला आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती जवान विनोद बोरसे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. देशाचं रक्षण करायचं की इकडे लक्ष द्यायचं? असा उद्विग्न सवाल जवानाने प्रशासनाला केला आहे.
फागण्याच्या महेंद्र पाटील याच्यासह इतरांनी सीमा सुरक्षा दलातील जवान विनोद बोरसेंसह इतर जवानांची व आंबोडे येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची घर बांधकामात फसवणूक केल्याचा आरोप जवानांनी केला आहे. अवघ्या दीड दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये देऊन घराचं बांधकाम करण्यात आला होता. मात्र करण्यात आलेल बांधकाम कालांतराने निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आल असून घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे पडले आहे. त्यामुळे संबंधित जवानांनी अनेक वेळा कंत्राट दाराकडे घर दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र कंत्राटदाराने वारंवार टाळाटाळ करत आरोरावीची भाषा केल्याचा आरोप जवानाने केला आहे. त्यामुळे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांची फसवणूक करणाऱ्या या कंत्राटधारा विरोधात पोलीस प्रशासनाने 420 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी जवान विनोद बोरसे यांच्यासह इतरांनी केली आहे.



