अकोट मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार भारसाकळे यांची मंत्र्यांकडे निधीची मागणी!आवाज न्यायाचा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

अकोट
दि १५ ऑक्टोंबर २६|
अकोट विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी मंत्रालय स्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या अंतर्गत त्यांनी बुधवार दि १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांचे पत्र सादर केले.
या भेटीदरम्यान आमदार भारसाकळे यांनी अकोट मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या विकासकामांना गती देण्याची गरज अधोरेखित केली. मतदारसंघातील रस्ते, पाणी, आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी प्राधान्याने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.
अकोट मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला हा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, असा विश्वास आमदार भारसाकळे यांनी या प्रसंगी व्यक्त केला. मंत्री आशिष शेलार यांनीही या मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


