खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक १ च्या मूलभूत सुविधांसाठी नगरसेवक हाशम शाह यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन….

कंपाउंड वॉल, पटांगणात पेव्हर ब्लॉक, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी मुक्ताईनगर नगरपंचायतीचे प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक हाशम शाह कासम शाह यांनी आज जिल्हा परिषद, जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने त्यांनी विविध विकासकामांची मागणी केली आहे.
सदर निवेदनाद्वारे शाळेच्या परिसराला संरक्षक कंपाउंड वॉल बांधणे, शाळेच्या पटांगणात पेव्हर ब्लॉक बसविणे, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र संडास व बाथरूमची सुविधा निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर फिल्टर मशीन बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शाळेच्या आवारातील झाडांचे संरक्षण करून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
शाळेच्या पटांगणात पावसाळ्यात चिखल होणे आणि पाणी साचणे यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक त्या भागात पेव्हर ब्लॉक बसविणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र स्वच्छतागृह व बाथरूमची सुविधा असणे महत्त्वाचे असून, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून निधी मंजूर करण्याची मागणी या सर्व कामांसाठी संबंधित विभागामार्फत शाळेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, आवश्यक तांत्रिक अंदाजपत्रक तयार करावे आणि जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध असलेल्या पात्र शासकीय योजना व निधीतून या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी मागणी नगरसेवक हाशम शाह कासम शाह यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या या मागणीकडे आता जिल्हा परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button