खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाची क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी!

1500 मीटर धावणे व थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक; मुलींच्या बॅडमिंटन संघाची प्रथम क्रमांकाची बाजी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

फैजपूर, दि. १५ ऑक्टोबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत फैजपूर येथील धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

जळगाव जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक तसेच बॅडमिंटन अशा विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले.

या स्पर्धेत धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचा पूर्वेश सुरेश तायडे याने १५०० मीटर धावण्याच्या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच पूर्वेश विश्वनाथ पाटील याने थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

दरम्यान, मुलींच्या बॅडमिंटन संघानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. या संघात टीना विजय धनगर, राधिका प्रसन्न गचके आणि लीना दुर्गादास सराफ यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

या सर्व गुणवंत खेळाडूंची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ते जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे फैजपूर परिसरात तसेच पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी, क्रीडा संचालक डॉ. गोविंद मारतळे, प्रा. दिलीप बोदडे व प्रा. पूनम कोल्हे यांच्यासह मार्गदर्शकांचे अभिनंदन होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा मधुकरराव चौधरी तसेच संचालक मंडळाने सर्व गुणवंत खेळाडूंचे कौतुक करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

फैजपूरच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मिळविलेल्या या यशामुळे विभागीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button